अवतरणं - रारंगढांग (Sea waves)


अवतरणं - रारंगढांग



"…तोच किनारा , तोच समुद्र. पण लाटा … मनातला आवेग असह्य झाल्यानं सहस्त्रकरांनी कवटाळायला आल्यासारख्या ! ह्या समाजाच्या बंधनांची क्षिती नाही, लोकांच्या नजरांची पर्वा नाही, तू माझा, मी तुझी, म्हणुन बाहू पसरून एकामागून एक मिठी घालणारया, प्रेमाचा हा पराकोटीचा, असहनीय, रुद्र अविष्कार प्रत्येक थेंबा थेंबा तून व्यक्त करणारया लाटा !… "



"…ह्या लाटा उसळत नाहीत, झेपावत नाहीत, तशाच रुन्जीही घालत नाहीत. त्या बोलतही नाहीत. पण ओठ बोलायचे थांबले की डोळे कितीतरी गोष्टी सांगून जातात. त्या लाटा काय सांगत आहेत?… "


















"…
ह्या लहरींवरचं स्मित अस्फुट आहे, गुढरम्य आहे. त्या स्मितात प्रेमभावना आहे, पण ती शब्दांत व्यक्त झालेली नाही. ती ज्या कीनारयाबद्दल आहे त्याच्यापर्यंत ती पोचावी असा आग्रहही नाही. कारण प्रत्येक शब्दाला श्रोता असायलाच हवा का? काही शब्द रानात उमललेल्या फुलाच्या गंधासारखेही असावेत. … "








No comments:

Post a Comment

Thank you for visiting !