अवतरणं - रारंगढांग (Nature)




अवतरणं - रारंगढांग

"…फोटो कितीही सुरेख असला तरी तो केवळ त्या क्षणाचं दृश्य रूप पकडतो. पण कलाकाराचा कुंचला त्यापलीकडं जातो. असं चित्र हे केवळ त्या वस्तुचं दृश्य रूप राहत नाही; तर कलावंताच्या मनाचाही प्रतिबिंब दिसू लागतं. ! … "




"…निसर्ग चित्र म्हणजे केवळ निसर्ग दृश्य नव्हे. तो निसर्गाशी संवाद व्हावयास हवा. हा संवाद एकदा साधला की निसर्ग आपणहून तुमच्याशी बोलू लागतो. त्याची भाषा केवढी वेगळी. त्याचे शब्द किती विविध !… "








"…थकव्यासारखी उशी नाही. श्रमासारखी गादी नाही. दमलेल्या, श्रमलेल्या माणसांची झोप किती गाढ असते ! कसली हालचाल नाही की अस्वस्थ तळमळ नाही. ही निद्रा त्यांच्याभोवती हलकेच एक गहिरं आवरण निर्माण करते. पोखरणारया काळज्या, जाळणारया चिंता ती त्यांच्या आसपास फिरकू देत नाही. हि गाढ झोप, गरिबांची संपत्ती. कोणत्याही जोखडापासुन ही तात्पुरती मुक्तीच ! ह्या थकून भागून झोपी गेलेल्या गुरख्यांना स्वप्न पडत असतील काय? असली तर त्यांना काय दिसत असेल? कित्येक मैल दूर असलेली त्यांची घरं, वाट पाहणारी पत्नी, मुलं? … "



"…काही भावना अशाही असाव्यात की ज्यांचा उगम केवळ स्वत:च्या हृदयातून व्हावा आणी तेथेच विरून जाव्यात. हृदयाच्या गाभारयातून निर्माण झालेली प्रत्येक इच्छा पूर्ण थोडीच होते? ती न व्हावी यातच सौंदर्य आहे. न संपणारी एक वेगळी जवळीक आहे. … "




No comments:

Post a Comment

Thank you for visiting !