इमले

 

आपण मनात बांधत राहतो इमले

यावं करिन आणि त्याव होईल

पण घंटा काहीच कुठे होत नाही

एक कप चहाने तल्लफ मिटत नाही


निघताना असतो शर्ट इस्त्री केलेला

भांग व्यवस्थित, सेन्ट सुवासिक

गर्दीला यातलं काहीच कळत नाही

एखाद्या शिवीने भांडण मिटत नाही


घरदार असत बऱ्यापैकी आणि कुटुंब

आरामात भागतात दैनंदिन गरजा

मत्सर मात्र मनाला सोडावीत नाही

पुढे पळण्याची तहान काही मिटत नाही


तरुणपणी असते ढीगभर ऊर्जा

सळसळत रक्त, उर्मी, आणि ईर्षा

म्हातारपणाला कशाचा गंध नाही

पाहिजे तेव्हा मात्र डोळा मिटत नाही




No comments:

Post a Comment

Thank you for visiting !