अरे वेड्या मना तळमळशी



अधिकार देणारा मी कोण?
देवाने सर्वांनाच मन दिलंय
प्रत्येक फुलाला सुगंध असतोच
ती जिवनाला आधार देतायत

तू बोलणार तरी किती?
शब्द नि:शब्द होईपर्यंतच ना!
प्रत्येक हसऱ्या मुकेपणा मागे
शेवटी एक गोड होकारच ना!

तू नाकारणार तरी काय?
आपलं प्रेम हे एकमेव सत्य आहे
हवं ते माग मी देईन ,
दु:ख कुठे सुखापासून वेगळं आहे?

काही छेडण्याची जरुरीच नाही,
हृदयाच्या तारानाच मी हात घातलाय
नाही म्हटलं तरी हा झंकार
तुझ्या रोमारोमात भरलाय

सुख दु:ख,
चंद्र तारे,
काही मनोरे,
काही कंगोरे,
काहीही आण
चालेल,
कारण ते मोठ्ठ स्वप्न,
फक्त दोघांच असेल.

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !