आनंद सोहळा

आनंद सोहळा 


View from our lab at NIT Rourkela on a rainy day

कातरवेळी आकाशाने 

केले ढीगभर ढग गोळा 

रचून ठेवले एकावर एक

केला आसमंत काळोखा 


अरे वर्षा राणी येतेय !

गडगडाटाने केला पुकारा  

पटदिशी  तयार व्हा 

होणारे एक सोहळा साजरा !


वारा झाला वेडापिसा ,

कुठं जाऊ त्याला कळेना ,

सैरावरा  घुटमळला ,

उठवत  साऱ्या झाडांना !


अत्यानंदुन धरा म्हणाली ,

तुम्ही माझी कमाल बघा !

भेटेल वर्षा तेव्हा करीन , 

मृदगंधाचा शिडकावा !


वीज म्हटली, बरं  झालं बाई !

वर्दी मिळाली वेळेत

लेऊन माझी चंदेरी साडी ,

तिच्या स्वागताला  मी नाचेन 

 

वर्षाराणी येताच पानांचे 

सुरु झाले समूह गान 

साऱ्या सृष्टींने धरला ठेका 

गेला हरेक विसरून भान 


बघत होतो मी गंमत 

राहून उभा कोपरयात 

बरं झालं चूक कळली 

खरी मजा चिंब भिजण्यात 






No comments:

Post a Comment

Thank you for visiting !